- February 4, 2025
- No Comment
चरसची विक्री करणारा टोळका गजाआड, एक लाखांचा अंमली पदार्थ जप्त

पुणे: अंमली पदार्थाची तस्करी करुन तिच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ९८ हजार २६० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
शिवलिंग नागनाथ आवटे (वय ३९, रा. शंभु रेसिडेन्सी, मांगडेवाडी, कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवून जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मांगडे वाडी येथील पुणे सातारा रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर शिवलिंग आवटे हा संशयास्पद रित्या थांबला होता. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली. त्यात त्याच्याकडे चरस, दोन मोबाईल व रोख रक्कम असा १ लाख ६९ हजार रुपयांचा माल आढळून आला.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेशा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, सचिन माळवे, विपुल गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.