- February 4, 2025
- No Comment
१०वी पास तरुणांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी;अर्ज कसा करावा?

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भारतीय टपाल विभागातील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे असावी.
इंडिया पोस्ट ऑफिसची ही भरती वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. सेंट्रल रिजनमध्ये १ रिक्त जागा आहे. एमएमएस चेन्नई येथे १५ जागा रिक्त आहेत. साउथ रिजनमध्ये ४ जागा रिक्त आहे. वेस्टर्न रिजनमध्ये ५ जागा रिक्त आहे. एकूण २५ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे.
भारतीय डाक विभागातील स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्यासोबत उमेदवाराकडे लाइट आणि हेवी मोटर व्हेईकल चालवण्याचे लायसन्स असायला हवे. उमेदवाराकडे तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.ही भरती ग्रुप सी डेप्युटेशन/ऑब्झर्व्हेशन बेसवर केली जाणार आहे.
इंडिया पोस्ट ऑफिसमधील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला लेवल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. या नोकरीसाठी अर्ज सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६००००६ येथे पाठवायचा आहे.