- February 4, 2025
- No Comment
घरी बसून बनवा ई-श्रम कार्ड (E-Shram Card), प्रत्येक महिन्याला मिळेल ३ हजार रुपयांची पेन्शन

सरकारने मजुरांसाठी एक पेन्शन योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत प्रत्येक मजूर वयाच्या ६० व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपयांची पेन्शन घेऊ शकेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना ई-श्रम योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
ई-श्रम कार्डसाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. पेन्शनसह मजुरांना इतर शासकीय सुविधा देखील मिळतील.
कामगार वर्गासाठी सरकारने पेन्शन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक मजुराला ६० वर्षांनंतर ३००० रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-श्रम योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बनवलेले ई-श्रम कार्ड मिळवू शकता. पेन्शनसोबतच इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळू शकतो.
ई-श्रम कार्डसाठी अर्ज करण्याचे वय
ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची ओळख करून त्यांना विमा संरक्षणासह मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत प्रत्येक कामगाराला एक युनिक डिजिटल कार्ड दिले जाते. भारतातील कोणताही कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतो. अर्जासाठी वय १६ ते ५९ वर्षे आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे, ज्या अंतर्गत कामगारांना नोंदणी करावी लागेल.
यामध्ये Ola-Uber, Amazon, Flipkart च्या प्लॅटफॉर्म कामगारांचा समावेश करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल अर्ज कोण करू शकतो. त्याच वय काय ही माहिती दिली. पण हे कार्ड मिळणार कसं ते सांगा. जर तु्म्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर तो अर्ज तुम्ही दोन प्रकारे करू शकतात. एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाइन . आज आपण जाणून घेणार आहोत. ई-श्रम कार्ड घरी बसून कशाप्रकारे बनवायचं?
ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया
ई-श्रम पोर्टलला भेट द्या (https://eshram.gov.in/).
होम पेजवरील eShram पर्यायावर नोंदणी करा वर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
EPFO, ESIC च्या सक्रिय सदस्याविषयीच्या माहितीमध्ये तुम्हाला होय किंवा नाही असे उत्तर द्यावे लागेल.
यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि शैक्षणिक माहिती द्यावी लागेल.
स्किल काय आहे , व्यवसायाचा प्रकार, कामाचा प्रकार निवडावे लागेल.
बँक तपशील प्रविष्ट करा आणि स्वयं-घोषणा पर्याय निवडा.
यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP एंटर करा आणि ‘Verify’ बटणावर क्लिक करा. यानंतर ई-श्रम कार्ड तयार होईल, त्यानंतर ते डाउनलोड करा.