- February 4, 2025
- No Comment
शहरातील अभ्यासिकांसह क्लासचालकांवर गुन्हा दाखल, बेकायदा जाहिराती केल्याप्रकरणी आकाश चिन्ह विभागाची धडक कारवाई

पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक खासगी क्लासेस आहेत. तर अभ्यासासाठी ५०० हून अभ्यासिका शहरात उभारण्यात आलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, म्हणून या क्लास आणि अभ्यासिका चालकांकडून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. परंतु ही जाहिरात करण्यासाठी काही चालकांनी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समोर आल्याने अभ्यासिकांसह क्लासवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यघटना बी.एन. अकॅडमी (शास्त्री रोड), ध्रुवतारा अभ्यासिका (पार्थ कॉम्पलेक्स, २ रा मजला, गांजवे चौक, नवी पेठ), युपीएससी गाईड (पेठ पुणे, प्रबोधनी सदाशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील आकाश चिन्ह परवाना निरीक्षक केदार सुभाष पुरी (वय,२७ रा. युवा रेसीडेन्सी यमुनाताई निल पोकळे नगर, धायरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसताना बॅनर लावुन शहराचे विदुपीकरण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर, कागदी पोस्टर्स यांचेवर कायदेशीर कारवाई करणे, सदर पोस्टर्स काढून टाकर्णी, मशिनरी परमिट देणे, परवान्याचे नुतनीकरण करणे, दुकानाचे नामफलकास परवाना या स्वरुपाचे कार्यालयीन कामकाज आहे. माझ्या आखत्यारीतील कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे बॅनर, कागदी पोस्टर्स लावले आहेत किंवा कसे यांची पाहणी करीत असताना, अप्पा बळवंत चौक, नुमवि शाळे शेजारी, शनिपार चौक, शनि मंदिराजवळ, बाजीराव रोड येथे बेकायदा बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. महापालिकेची परवानगी न घेता बॅनर लावल्याने क्लास आणि अभ्यासिका चालकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स लावताना, वरील जाहीरातदार यांनी कोणत्याही प्रकारची पुणे महानगर पालिकेची परवानगी घेतली नाही, सदरचे पोस्टर्स र्यालयीन सहकारी यांच्या मदतीने काढून घेतले, व त्या कारवाईचा सविस्तर पंचनामा केला. सदरचा बॅनर्स पुढील कारवाई करीता पोलीस ठाणेस हजर केला आहे. महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम कलम ३ व महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम १९४९ कलम २४४, २४५ अन्वये कायदेशीर तक्रार केली आहे. असे फिर्यादी पुरी यांनी सीविक मिररला सांगितले.
पुरी म्हणाले, शहरात विद्युत खांबावर तसेच विद्युत डीपीवर जीव धोक्यात घालून बेकायदा क्लास आणि अभ्यासिका चालक बॅनरहबाजी करत आहेत. महापालिकेची परवनागी न घेता असे प्रकार केले जात आहे. शहरातील अनेक क्लास आणि अभ्यासिका चालकांना गेल्या तीन महिन्यांपासून नोटीस पाठवत आहे. त्यानंतरी कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तसेच दंडात्मक रक्कम भरण्यास चालढकल केली जात आहे. अखेर गेल्या काही दिवसांपासून बेकायदा जाहिरात करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. असे प्रकार केल्यास थेट पोलिसात तक्रार दाखल केली जात आहे.