• February 16, 2025
  • No Comment

धक्कादायक! चक्क आयटी इंजिनियर बनला चोर

धक्कादायक! चक्क आयटी इंजिनियर बनला चोर

    हिंजवडी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधानी बाळगणे गरजेचे आहे. पुण्याच्या हिंजवडीमध्ये शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे, आयटी इंजिनियर चक्क चोर बनला आहे. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी या इंजिनिअरने चोरीचा मार्ग निवडला.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, निखिल खाडे असं या इंजिनीयरचे नाव आहे. निखिल गेली काही वर्ष आयटी नगरी हिंजवडी मध्ये वास्तव्यास आहे. त्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची सवय होती. पाच महिन्यांपूर्वी निखिलला पाच ते सात लाख रुपयांचा शेअर बाजारामध्ये फटका बसला. त्यानंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग निवडला. त्याने चक्क मोबाईल आणि लॅपटॉप चोरीला सुरुवात केली. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या निखिलने आजूबाजूच्याच जवळच्या व्यक्तींना सॉफ्ट टार्गेट करत त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करण्यास सुरू केले. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान निखिलचं चोर असल्याचं स्पष्ट झालं.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *