• February 16, 2025
  • No Comment

विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक सराईत आरोपी अटकेत एक फरार

विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक सराईत आरोपी अटकेत एक फरार

    लोणी काळभोर: कुवेत देशातील ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करणाऱ्या परदेशी नागरिकाच्या तरडे येथील घरातील जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या तिजोरीतील सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा असा तब्बल १४ लाख ५० हजारांचा ऐवज चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या एकाला लोणी काळभोरपोलिसांनी बेड्या ठोकल्या.

    त्याच्याकडून पोलिसांनीचोरी गेलेल्या दागिन्यांपैकी ९ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

    संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस, थेऊर, कोलवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.

    आरोपीने चोरलेल्या दागिन्यांपैकी ९५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीची वीट जप्त करण्यात आली आहे. याबाबत स्टीफनविक्टर वलेरयण लासराडो (५१, अलअमादी, गव्हर्नरेट, देश कुवेत व रेल्वे कोलस वस्ती, तरडे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तरडे येथे लासराडो यांनी ४ गुंठे जागेवर घर बांधले आहे. ते कुवेत येथील एका ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करतात. वर्षातून दोन ते तीन वेळा ते भारतात येत असतात. त्यांनी घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. परंतु, अचानक ३१ जानेवारी रोजी त्यांच्या घराचे कॅमेरे बंद दिसून आल्याने त्यांनी माहिती घेतली असता, त्यांच्या घरात घरफोडी झाल्याचे आढळून आले.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला फिर्यादी हे कुवेतवरून पुण्याला निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांना घराच्या बेडरूमधील फरशीखाली त्यांनी तिजोरी केली होती. त्यात एका डब्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे त्यांना आढळले. त्यांचे तब्बल १४ लाख ५० हजारांचे दागिने यावेळी चोरीला गेले. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना ही चोरी आरोपी संगतसिंग कल्याणी व त्याच्या साथीदाराने केल्याचे समजले. संगतसिंगचा माग काढण्यात पथकाला यश आले. तो वृंदावन पॅलेस येथील त्याच्या घरी आला असता, त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. तसेच, चोरीला गेलेले ९ लाख ५० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तीन घरफोडींचे, तसेच अन्य ठिकाणचे सहा असे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

     

    सदरची कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, सुनील नागलोत, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदीप गाडे, चक्रधर शीरगिरे यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *