• February 16, 2025
  • No Comment

गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

    मावळ: गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

    निगडे ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडला. जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे वय 40 रा. कल्हाट ता.मावळ जि.पुणे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

    संतोष महादु जाचक (वय 35, रा. स्वराज्य नगरी फ्लॅट नं 4, स्वामी दर्शन अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मूळ रा . करवंदे वस्ती कल्हाट ता. मावळ जि. पुणे), आदिनाथ लाला खापे (वय 27 रा. कोंडीवडे ता. मावळ जि.पुणे), रोहन मुरलीधर आरडे (वय 23) व ओमकार देविदास खांडभोर (वय 23) दोघे रा घाटेवाडी पोस्ट वडेश्वर ता. मावळ जि.पुणे गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे (ता मावळ जि पुणे) हद्दीत डांबरी रोडवर फिर्यादी हे तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापु देशमुख असे कार एम. एच. 14 एल. वाय 2842 मधुन कल्हाट कडे जात असताना, आरोपी संतोष जाचक, अधिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाचे कारणावरून संगनमत करून त्यांचेकडे असलेले स्विफ्ट कार ही फिर्यादीच्या कारला आडवी मारून फिर्यादीची गाडी थांबवुन गाडीच्या काचा फोडुन संतोष महादु जाचक याने फिर्यादीला त्याचेकडील पिस्टल दाखवून गाडी मधुन खाली उतरण्यास भाग पाडले.

    आरोपी संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादीला डोक्यावर व शरिरावर ठिकठिकाणी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले.

    वडगाव मावळ पोलिस स्टेशन गु.र.नं 64/2025 भारतीय न्याय संहिता अधि सन 2023 चे, कलम109,189(2),189(4), 191(3),191(2),190,324(4),126(2), 352, 351(2) आर्म अँक्ट 3(25), 4(27) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *