• February 16, 2025
  • No Comment

हॉटेलमधील हुक्कापार्लरवर बावधन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेलमधील हुक्कापार्लरवर बावधन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    म्हाळुंगे: हॉटेलमधील हुक्कापार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. महाळुंगे येथील कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

    ओंकार महेश खानेकर (२९, रा. सुतारदरा लेन नं. २७, शिवशक्तीनगर, कोथरुड, पुणे) व निनाथ दिलीप पाडाळे (रा. बाणेर, पुणे) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाथ पाडाळे हा कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट या हॉटेलचा मालक आहे. तर खानेकर हा हुक्का बनवतो. हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बावधन पोलिसांनी कारवाई केली. यात निनाथ आणि ओंकार हे हॉटेलमध्ये बेकायदारित्या चार हजार ५०० रुपयांचे हुक्कापॉट व हुक्का तंबाखूजन्य फ्लेवर विक्रीसाठी बाळगताना मिळून आले. तसेच हुक्का पिण्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गर्दी करून त्यांना हुक्का पिण्यास व जेवणास एकत्र बसवले. कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट येथे ही कारवाई करुन बावधन पोलिस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *