- February 16, 2025
- No Comment
भरधाव टेम्पोच्या धडकेत दोघे जखमी, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
पिंपरी : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना मुळशी तालुक्यातील भुकूम येथे घडली.
याप्रकरणी संजय जिजाबा शितकल (५९, रा. खोपरेगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुमीत आणि त्याचा मित्र वृषभ साळवे हे दोघेही लवळे येथून खोपरेगाव येथे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भुकूम येथून पिरंगुटकडे येत असलेल्या टेम्पो चालकाने विरुद्ध दिशेने टेम्पो भरधाव चालवून सुमीत याच्या दुचाकीला धडक दिली. यात सुमीत यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तसेच सुमीत यांचा मित्र वृषभ यांनाही दुखापत झाली आहे.टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.