- February 15, 2025
- No Comment
तंबाखू न दिल्याने एकाला दांडक्याने बेदम मारहाण

पिंपरी : तंबाखू न दिल्याने तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना चिंचवड येथील आनंदनगरमध्ये घडली.
याप्रकरणी रवी मच्छिंद्र लोंढे (३३, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जय उर्फ गोट्या सोनवणे (रा. आनंदनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय याने फिर्यादी यांच्याकडे तंबाखू मागितली. त्यावर माझ्याकडील तंबाखू संपली आहे. मला विकत घ्यावी लागेल, असे फिर्यादी रवी यांनी सांगितले. दरम्यान, फिर्यादी हे उलट बोलत असल्याचे रवी याला वाटले. या कारणावरून चिडून रवी याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.