- February 15, 2025
- No Comment
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : भरधाव मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना रावेत येथे घडली.
याप्रकरणी सुधाकर गजानन देशमुख (७५, रा. शुक्रवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्निल उर्फ तुकाराम उत्तम दिवटे (२९, रा. मारुंजी, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी स्वप्निल दिवटे याच्या ताब्यातील मोटारीने सुधाकर यांच्या दुचाकीला धडक दिली. यामधे दुचाकीस्वार वृद्ध गंभीर जखमी झाला आहे.