- February 15, 2025
- No Comment
गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ३१ लाख ५८ हजारांना घातला गंडा
पिंपरी: गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपळे गुरव येथील ५२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार गितीका आनंद व इतर व्यक्तींवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ग्रुपमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगून फिर्यादीच्या मोबाइलमध्ये झेडडी ट्रेड प्रो ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर भासवले. फिर्यादीस बँकेचे खात्यावर ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणुकीवर परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.