आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग हे बघाच!

    आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग हे बघाच!

    आधार कार्ड भारतीयांची ओळख आहे. भारतात सगळीकडे आपल्याला आधार कार्डची गरज असते. तर आधार कार्ड आज सगळीकडे व्हॅलिड आहे. म्हणजेच तुम्ही ओळख पत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात.

     

    अशात आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर देखील लिंक असतो. ज्यामुळे अनेकदा लोकं वेगवेगळे मोबाईल आणि त्यात एकपेक्षा जास्त नंबर वापरतात. त्यामुळे अनेकदा लोकं विसरून जातात की त्यांनी कोणता नंबर लिंक केला होता. अशात आज आपण अशा एका ट्रिकविषयी जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्हाला लगेच कोणता नंबर हा आधार कार्डला लिंक केला आहे ते कळतं. 

    यूआईडीएआई एक अधिकृत वेबसाईट आहे. त्या साईटवरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर कोणता नंबर लिंक करण्यात आला आहे याची माहिती मिळेल. सगळ्यात आधई टॉपला My Aadhaar वर क्लिक करा. इथे पुढे तुम्हाला Aadhaar Services हा पर्याय दिसेल. त्याच्या अगदीच खाली Verify Email/Mobile Number लिहिला असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डला तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते समोर येईल. 

     

    दरम्यान, अनेकदा असं पाहायला मिळतं की जो नंबर तिथे टाकलेला असतो तो आधीच व्हेरिफाय झालेला असतो. त्यावेळी तुम्हाला एक मेसेज दिसेल तो मेसेज म्हणजे (The mobile number you have entered is already verified with our records) असं लिहिलेलं दिसतं. त्यानंतर जर तुम्ही जो मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नाही तो तिथे एंटर केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला आणखी एक मेसेज पाहायला मिळेल. त्यात लिहिलं असेल की (The mobile number you have entered does not match with our records) असा मेसेज लिहिलेला असेल. असं केल्यानं वेगवेगळ्या नंबरला एंटर केल्यानं तुम्हाला कळू शकतं की कोणता मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे आणि कोणता नाही. दरम्यान,सुरुवातीला तुम्हाला हे थोडं कठीण वाटेल पण तुम्ही सहजपणे करु शकता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *