• November 18, 2025
  • No Comment

सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण हत्या

सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण  हत्या

    पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे आज सोमवारी दुपारी घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेनं शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रहिवासी सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करत आणि त्यानंतर मोठ्या दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. दुपारी साधारण अडीचच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. खून झालेल्या तरुणाचं नाव तौकीर शेख (वय 22, रा. धनकवडी) असं आहे. तौकीरवर यापूर्वी काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचंही पुढे आलं आहे.

    सिंहगड रोड भागातील मिनाक्षीपुरम परिसरातील ‘कृष्णकुंज’ इमारतीच्या पार्किंगमधे दुपारच्या वेळेस तौकीर शेख एकटाच बसलेला होता. त्याचवेळी पाच जणांचे टोळके अचानक येथे दाखल झाले. कोणतीही चर्चा न करता त्यांनी हातातील कोयत्याने तौकीरवर जोरदार हल्ला सुरू केला. काही क्षणांतच तौकीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मात्र हल्लेखोर एवढ्यावरचं थांबले नाही. त्यांनी मोठा दगड उचलून तौकीरवर वारंवार दगडाने प्रहार करून त्याचा जीव घेतला. हत्येनंतर हे सर्व आरोपी काही क्षणांत घटनास्थळावरून फरार झाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *