• November 18, 2025
  • No Comment

पिस्टल घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त

पिस्टल  घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त

    पुणे : विरोधी टोळीतील लोक हल्ला करतील, या भितीने मध्यप्रदेशातून पिस्टल आणून ती घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

    आशिफ सबीरखा तेली (वय २१, रा. सय्यदनगर, हडपसर), यश सुभाष मदने (वय २०, रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती) आणि प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. वडगाव निंबाळकर, निरा रोड, बारामती)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रथमेश लोंढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर यश मदने याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे. आशिफ तेली याच्या आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे.

    आगामी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सर्वांना आपल्या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध धंदे, तडीपार आरोपी, शस्त्र बाळगणारे आरोपी यांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व दाऊद सय्यद यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आशिफ शेख हा त्यांच्या दोन साथीदारांसह महंमदवाडी पालखी रोड मार्ग येथे थांबला असून त्यांच्याकडे शस्त्र असण्याची शक्यता आहे. या बातमीनुसार पोलीस पथक हेवन पार्क व लक्ष्मी पार्क कडे जाणारा मधल्या कच्च्या रोडला गेले असता तेथे तिघे जण थांबले असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना चोहो बाजूने घेऊन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे असा २ लाख ४२ हजार रुपयांचा माल आढळून आला. काळेपडळ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

    प्रथमेश लोंढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. विरोधी टोळीतील लोक हल्ला करतील, या भितीने मध्य प्रदेशातून शस्त्रे आणून जवळ ठेवली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

    ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *