• November 18, 2025
  • No Comment

धमकावुन बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला धक्का देऊन तेथून आपली सुटका करुन घेऊन बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

धमकावुन बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला धक्का देऊन तेथून आपली सुटका करुन घेऊन बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

    पुणे : घरी येणार्‍या एका नराधमाने एका १७ वर्षाच्या मुलीला चहाच्या दुकानाच्या आतील छोट्या रुममध्ये नेऊन तिला धमकावुन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मुलीने धाडस दाखवत या नराधमाला धक्का देऊन तेथून आपली सुटका करुन घेऊन पळून गेली. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

    सद्दाम शाहबुद्दीन शेख (वय ३६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम शेख हा ७ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादीच्या आईला भेटायला घरी आला होता. तिची आई वॉशरुमला गेली असताना त्याने फिर्यादीचा हात ओढून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला ढकलून दिले़. हा प्रकार तिने आईला सांगितला. तेव्हा त्याने मी मस्करी करीत होतो, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीच्या आईने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नेहमी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहून तिला नको असलेला स्पर्श करुन तिचा सातत्याने विनयभंग करत होता.

    चार महिन्यांपूर्वी या नराधमाने फिर्यादीला त्याचे एयरकिंग वाईन शॉप समोरील एका चहाच्या दुकानावर बोलावून घेतले. तिला आतील छोट्या रुममध्ये नेऊन आरडाओरडा केल्यास जीवे ठार मारीन, अशी धमकी देऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा तिने मोठ्या धाडसाने त्याला धक्का मारुन ती रुममधून पळून गेली. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरलेल्या होत्या. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने हा प्रकार तेव्हा कोणाला सांगितले नाही़ त्यानंतर त्याने १३ नोव्हेंबर रोजीही तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

    बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले की, ही अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांना घेऊन १६ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *