- November 18, 2025
- No Comment
कोयते घेऊन भर रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलिसांनी केली अटक

पुणे : सोलापूर बाजार येथील मारवाडी गल्लीत मध्यरात्रीच्या सुमारास दहशत निर्माण करण्यासाठी कोयते घेऊन लोकांना शिवीगाळ करुन धमकाविणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल प्रमोद पवार (वय २०, रा. सोलापूर बाजार, कॅम्प), विराज सतिश गाडे (वय २१, रा. कॅनल गल्ली, सोलापूर बाजार), अंश नितेश खरात (वय २२, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कॅम्पमधील सोलापूर बाजार येथील मारवाडी गल्लीमध्ये १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला. याबाबत पोलीस हवालदार अतुल ज्ञानेश्वर मेंगे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.




