- November 16, 2025
- No Comment
बजरंग दलाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

मावळ;बेलज येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे नियोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल व अनुलोमच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून देशभरामध्ये जनजाती दिवस म्हणून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जात आहे. हेच अवचित्य साधून बेलज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला स्थानिक आदिवासी माता भगनी व नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केलं..

याप्रसंगी स्थानिक युवक रोहन वाजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं..
तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्रजी असवले यांनी भगवान बिरसा मुंडा यांची सामाजिक जीवन या विषयाची मांडणी केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अनुलोम भाग जनसेवक प्रा, बाळासाहेब खांडभोर यांनी बोलत असताना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राचा उलगडा करुन सामाजिक समरसता या विषयावर मार्गदर्शन केले, अशा महान विभूतींचे चरित्र आत्मसात करणे काळाची गरज आहे असे सांगितलं.

कार्यक्रमाचे आभार सुखदेव महाराज गवारी यांनी केले.
त्यानंतर आलेल्या सर्वांना संघटनेच्या वतीने अल्पोपहराचे वाटप करण्यात आलं.
या जयंतीचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्रजी असवले, अनुलोम भाग जनसेवक बाळासाहेब खांडभोर, संपर्कप्रमुख निखिल भांगरे, प्रखंड मंत्री स्वप्नील भालेकर, गोरक्षक दर्शन आगळमे, साप्ताहिक मिलन प्रमुख गौरव वाघमारे, तसेच स्थानिक बाळासाहेब कोकाटे, दीपक चिमटे, अशोक कोकाटे, बाजीराव वाजे व काही माता भगिनी उपस्थित होत्या.
[ मावळ प्रतिनिधी ; बाळासाहेब खांडभोर]





