• November 7, 2025
  • No Comment

तरुणाच्या कारला दुचाकीची धडक देऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांनाआंबेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

तरुणाच्या कारला दुचाकीची धडक देऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांनाआंबेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

    पुणे : पुणे बंगलोर महामार्गावरील आंबेगाव येथील सीसीडी कॅफे येथे थांबलेल्या तरुणाच्या कारला दुचाकीची धडक देऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना आंबेगाव पोलिसांनी पकडले आहे.

    मृणाल दीपक जाधव (वय २०, रा. कात्रज) याला अटक केली आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

    याबाबत अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. विश्व हाईटस, सिद्धी विनायक सोसायटी, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अक्षय बांदल हे त्यांचा भाऊ आकाश बांदल, ओंकार बांदल, मित्र सार्थक वाल्हेकर, अमन भाटिया यांच्याबरोबर २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सीसीडी कॅफे येथे कारने कॉफी पिण्यासाठी गेले. कॉफी पिऊन झाल्यावर बाहेर येऊन कारच्या पाठीमागे गप्पा मारत उभे होते. त्यावेळी कारचे पुढील बोनेटला एका मोपेडने कारच्या बोनेटला धडक दिली होती. मोपेडवरील तिघे जण खाली पडले. यावेळी एका अल्पवयीन मुलाने कमरेचा कोयता काढून याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत अक्षय यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मृणाल जाधव याने त्याच्याकडील कोयत्याने अक्षय बांदल यांच्या डाव्या हाताचे पंजावर वार केला.दुसर्‍या मुलाने त्याच्याकडील कोयत्याने उजव्या हाताचे मनगटावर, पाठीवर व डाव्या पायाचे पजावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी मित्र पुढे झाल्यावर या तिघांनी हवेत कोयते फिरवून ‘‘आम्ही इथले भाई आहोत़ कुणी आमचे नादी लागू नका’’असे बोलून दहशत पसरवित ते पळून गेले. अक्षय बांदल याला भाऊ व मित्रांनी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन तिघांना पकडले. मृणाल जाधव याला अटक केली.

    ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी, पोलीस अंमलदार विशाल मगदुम, भिवा वाघमारे, राहुल मोहिते यांनी केली आहे

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *