• November 7, 2025
  • No Comment

प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला बंडगार्डन  पोलिसांनी केले जेरबंद

    पुणे : पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहनतळासमोरील कात्रज बसस्टॉपकडे चालत जात असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २ मोबाईल व एक मोटारसायकल असे ३ गुन्हे उघडकीस आणून ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

    अर्जुन हिराजी भोसले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहरात विविध ठिकाणी ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार पळून गेला आहे.

    रविशंकर बंडप्पा खुबा (वय ३१, रा. कात्रज चौक, कात्रज) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहनतळाकडून समोरील कात्रज बसस्टॉपकडे जात होते. भावाला फोन करण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल काढला. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. ते बोल्हाई चौकाच्या दिशेने निघून गेले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात खुबा यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या चोरट्यांनी विनानंबरप्लेटची मोटारसायकल वापरल्याचे दिसून आले. ही मोटारसायकल व त्यावरुन मिळालेल्या वर्णनाच्या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरुन एक जण जाताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडील मोटारसायकल ही राजगड पोलीस ठाण्यातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

    हरीश रतनलाल पटेल (वय २०, रा. मोहननगर, धनकवडी) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे पुण्यात आले होते. पुणे स्टेशवरुन ते स्वारगेटला आले. स्वारगेट बसस्थानकाबाहेर पहाटे साडेचार वाजता ते मित्राला फोन करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. स्वारगेट येथून मोबाईल चोरल्यानंतर ते पुणे स्टेशनला आले. तेथे त्यांनी दुसरा मोबाईल हिसकावून घेतला होता. बंडगार्डन पोलिसांनी हे दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा ७० हजाराचा माल जप्त केला आहे.

    ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फासो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे, तुकाराम हिवाळे यांनी केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *