- November 7, 2025
- No Comment
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आता प्रशासन अॅक्शनमोडवर आले असून तहसीलदार सूर्यकांत येवले याचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. पुणे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थेतील बडे अधिकारी दोषी आढळल्याचे समोर आले आहे. आणखी काही अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे का याची चौकशी सुरू आहे. आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकतो. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी सक्रिय होते अशी माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.




