- December 27, 2024
- No Comment
वाहन चोरी करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड ! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी
पुणे: दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून चोरीची ६ वाहने जप्त केली आहेत. अर्जुन हिराजी भोसले (वय २१, रा.अप्पर इंदिरानगर) असे या सराईत वाहन चोरट्याचे नाव आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी अर्जुन भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहन चोरी केली होती. त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रुपयांची ६ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. हडपसर, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाणे अशा ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, पोलीस अंमलदार राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, सुनिल महाडीक, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले, अमोल सरतापे यांनी केली आहे.