• December 27, 2024
  • No Comment

पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ; कोथरूडमध्ये महिलांचे दागिने चोरले

    पुणे: कोथरूड भागात पादचारी दोन ज्येष्ठ महिल़ांना साहेबांना मुलगा झाला असून, त्याचे गिफ्ट देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडील १ लाख २५ हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.

    भरदुपारी हा प्रकार घडला आहे. यापुर्वीही अशा घटना कोथरूड, सिंहगड रोड या भागात घडल्या आहेत. याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन चोरट्यांवर गु्न्हा नोंद केला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. मंगळवारी (२४ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास त्या व त्यांची एक मैत्रिण परमहंसनगर भागातून निघाल्या होत्या. पायी चालत असताना दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी आमच्या साहेबांना मुलगा झाला आहे. गरीब व गरजू महिलांना साड्या, धान्य वाटप करत आहोत, अशी बतावणी केली. नंतर तुम्ही गरजू असल्यासारखे वाटायला हवे. तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे म्हणत हात चालाखी करून चोरट्यांनी त्यांचे एक लाख २५ हजारांचे दागिने चोरून नेले.

    शहरात दुचाकीस्वार चोरट्यांसोबतच गर्दीत, प्रवासात तसेच एकट्या पादचारी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. संधी साधून चोरटे दागिने चोरून पसार होत आहेत. मात्र, या टोळ्यांचा तसेच चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

    पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते.

    सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *