• December 27, 2024
  • No Comment

बांगलादेशी घुसखोर बोगस आधुनिक वैद्य गजाआड, आतंकवादविरोधी पथकाची कामगिरी

बांगलादेशी घुसखोर बोगस आधुनिक वैद्य गजाआड, आतंकवादविरोधी पथकाची कामगिरी

    पुणे: कोणतीही वैध कागदपत्रे नसतांना भारतामध्ये घुसखोरी करून काही दशकांपासून रहाणार्‍या एका ५० वर्षीय संशयित बांगलादेशी बोगस आधुनिक वैद्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आतंकवादविरोधी पथकाने थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये २४ डिसेंबर या दिवशी केली आहे. संशयित आरोपीचा जन्म बांगलादेशामध्ये झाला आहे. आरोपीने घुसखोरी करून भारतामध्ये प्रवेश मिळवला. प्रथम तो कोलकाता येथे राहिला. त्यानंतर देशातील विविध ठिकाणे फिरून तो थेऊर येथे वास्तव्यास आला. त्याने तिथे रुग्णालयही चालू केले होते.

    याची माहिती मिळताच आतंकवादविरोधी पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. आरोपीने भारतातील बनावट जन्म दाखला सिद्ध करून आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), रेशनकार्ड (शिधापत्रिका), मतदान कार्ड अशी सर्व बनावट कागदपत्रे सिद्ध केली होती. ती जप्त करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *