- December 27, 2024
- No Comment
श्री निवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणित विषयाचे प्रदर्शन

गणित प्रदर्शन भरण्यात आले होते . रामानुजन हे एक भारतीय गणितज्ञ होते . त्यांना गणिताचे जवळजवळ कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण संख्या अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले .
कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे
गवळी सर प्राचार्य पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल बोरकर मॅडम मुख्याध्यापिका कन्या प्रशाला. शाळेच्या प्राचार्या शेवाळे मॅडम इनामदार मॅडम शाहीन मॅडम तसेच प्रियंका भोसले मॅडम अर्चना चव्हाण मॅडम आणि सर्व गणितीय शिक्षक यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये. इयत्ता १ ली ते १० च्या विध्यार्थीनी सहभाग घेतला होता
प्रमुख पाहुण्यांनसमवेत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल च्या तिडके मॅडम तसेच कन्या प्रशाला शाळेतील कराड मॅडम ,वेदपाठक मॅडम व पी. व्ही.पाटील सर हे गणित विषयाचे अध्यापक यांनी प्रदर्शनाची बारकाईने पाहणी करून . मुलांचे कौतुक केले . तसेच त्यांनी मुलांनी जे गणितीय साहित्य बनवले त्याबद्दल ते प्रश्न विचारत होते . व मुलेही आनंदाने उत्तर देत होते
यानिमत्तने संगीताताई काळभोर अध्यक्षा महिला बचत गट यांनी शाळेसाठी लागणारे शैक्षणीक साहित्याची मदत केली.
या प्रदर्शनामध्ये शाळेतील गणित विषयाच्या शिक्षिका कवडे मॅडम व इतर शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले.यावेळी गवळी सर, बोरकर मॅडम, शेवाळे मॅडम यांनी मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रतिनिधी दिगंबर जोगदंड लोणी काळभोर