• December 27, 2024
  • No Comment

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

    स्काऊट गाईड अंतर्गत इयत्ता सहावीच्या मुलांनी सिंधुताई सपकाळ संस्थापित सन्मति बालनिकेतन येथे भेट दिली. सोबत माननीय प्राचार्य सौ. शेवाळे पि. डी. शिक्षिका- १) सौ.स्वाती राजेश लोखंडे. २) सौ. रेश्मा चंद्रशेखर काळभोर उपस्थित होत्या.दिनांक २०/१२/२२४ वार शुक्रवार रोजी पूर्व नियोजनानुसार संस्थेकडून आलेल्या आवश्यक वस्तूंच्या यादीनुसार मुलांनी खालील भेटवस्तू आश्रमात देण्यासाठी जमा केल्या.

    बटाटे,कांदे,लसूण ,तूर डाळ , अंबारी, मिरची पावडर, , निरमा, हारपीक,फिनाईल, विमबार साबण ,पॅराशूट ऑइल, पावडर,कपड्याचे साबण,आंघोळीचे,साबण,हँडवॉश ,लॉयजॉल,बिस्किट ,शेंगदाणे,व्यासलन,गुड नाइट लिक्विड,पोछे,झाडू,किचन न्यापकीन

    सर्व मुले व शिक्षिका शाळेतून साडेबारा वाजता आश्रमाला भेट देण्यासाठी निघाले मुलांनी बसमध्ये विविध प्रार्थना व गाणी म्हणून प्रवासाचा आनंद घेतला.

    आश्रमात पोहोचल्यावर तेथील सहकाऱ्यांनी पूर्ण आश्रमाची ओळख करून दिली व सिंधुताईंचा जीवनक्रम सांगून त्यांच्या पारितोषकां बद्दल व्यवस्थित माहिती दिली. आश्रमातील मुलांना भेटून स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना गहिवरून आले.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *