• December 27, 2024
  • No Comment

पुणे : तंबाखु, गुटखा खाताय तर ५ हजार रुपये दंड; व्यसन करणार्‍या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

पुणे : तंबाखु, गुटखा खाताय तर ५ हजार रुपये दंड; व्यसन करणार्‍या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

    पुणे: गणवेशावर व कार्यालयात कोणाकडे गुटखा, तंबाखु, दारु, सिगरेट जवळ आढळून आल्यास पोलिसांवर तात्काळ शिस्तभंगाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे.

    पोलिसांमध्ये तंबाखुचे व्यसन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. कार्यालयात असताना बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी हे तंबाखु, गुटखा खातात व त्याची थुंक कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, कार्यालयाचा परिसरात टाकत असतात. त्यातून पोलीस कार्यालयाचा परिसर खराब व घाण होतो. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एका आदेश काढला आहे.

    सर्व पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशात असताना पोलीस दलातील व इतर शासकीय कोणत्याही कार्यालयात जाताना येताना आपले जवळ गुटखा, तंबाखु, दारु, सिगरेट बाळगु नये. कार्यालयात असताना कोणीही गुटखा, तंबाखु खाऊन कार्यालयातील भिंतींवर, बाथरुममध्ये किंवा कार्यालयातील परीसरात थुंकू नये. गणवेशांवर सिगारेट ओढू नये, कोणी कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, परीसरात थुंकताना आढळून आल्यास संबधितांवर तात्काळ शिस्तभंगाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात येईल.

    तसेच गणवेशावर व कर्तव्यावर असताना कोणीही दारु प्यायलेला आढळून आल्यास संबंधित अधिकारी व अंमलदार यांच्यावर तात्काळ निलंबनाची व कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

    या आदेशपत्राचे पोलीस ठाण्याकडील दैनंदिन हजेरीवेळी पुढील ५ दिवस सतत वाचन करुन सर्वांना अवगत करावे. तसेच पोलीस ठाण्याकडील नोटीस बोर्डावर व व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये प्रसारित करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *