• December 27, 2024
  • No Comment

पुणे: चक्क आई सोबत असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: चक्क आई सोबत असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: पुण्यातून एका अल्पवयीन मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आले. पुणेपोलिसांनी या मुलीची मुंबईवरून सुटका केली आहे.

    ही घटना २६ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील धनकवडी भागात घडली. याप्रकरणी, पीडित तरुणीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी मध्ये म्हटल्यानुसर, १६ वर्षीय तरुणी तिच्या आईसोबत रस्त्याने जात असताना एक दुचाकीवरून आलेल्या २ तरुणांनी त्यांना अडवले. खिशात असलेलं बंदूकीसारखं काहीतरी काढलं आणि आईच्या डोक्याला लावलं. दरम्यान, त्यांनी आईसोबत असलेल्या तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून फरार झाले. हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता आहे. आरोपी आणि तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या आरोपींपैकी एका तरुणाचे संबंधित तरुणीवर प्रेम होते असा संशय सध्या पोलिसांना आहे आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, आरोपीने संबंधित तरुणीला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती मिळताच, पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आरोपी आणि संबंधित तरुणी हे खालापूर येथून पुण्याच्या दिशेने एका बस मधून येत आहे. हे समजताच पोलिसांनी खालापूर गाठले आणि तरुणीची सुटका केली.

    मात्र त्या तरुणाने तिथून पळ काढला. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणात यश कातूर्डे नामक तरुण आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *