• December 27, 2024
  • No Comment

तरुणाई नशेच्या आहारी, वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी गजाआड

तरुणाई नशेच्या आहारी, वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी गजाआड

    हडपसर: वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदा औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

    अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ डिसेंबर) हडपसर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी अंबिका ठाकूर ही वेदनाशामक, तसेच भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

    अंबिका ठाकूर हिच्याकडे औषध विक्रीचा परवाना नाही, तसेच तिच्याकडे औषधनिर्मिती अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा वापर केल्यास दुष्परिणाम होतात, तसेच औषधाचे सेवन करणाऱ्याच्या आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकते. ठाकूरला याबाबतची माहिती होती. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, गायत्री पवार यांनी ही कामगिरी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *