• December 27, 2024
  • No Comment

तरुणीला धमकावुन जातीवाचक शिवीगाळ करणारे दोन भाऊ गजाआड

तरुणीला धमकावुन जातीवाचक शिवीगाळ करणारे दोन भाऊ गजाआड

    वाघोली: तू माझीच आहे, माझे सोबत चल पळून नाही तर तुला तोंड दाखवायचे लायकीचे सोडणार नाही, असे धमकावून तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघा भावांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.

    गजानन संतोष आढाव (वय २५) आणि गोपाळ संतोष आढाव (वय ३१, रा. आव्हाळवाडी, ता़ हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ नोव्हेबर ते २२ डिसेंबर दरम्यान घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्या महाविद्यालयात जात असताना गजानन आढाव हा नेहमी फिर्यादीकडे पाहून हातवारे करत तू माझीच आहे, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत.

    तसेच त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर “माझे सोबत चल पळून नाहीतर तुला तोंड दाखवायचे लायकीचे सोडणार नाही. तुझ्या भावाचे तुकडे करेल, जर तू आली नाही,” असा मेसेज करुन जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीने हा मेसेज कोणाकडून आला हे तपासले तर ट्रुकॉलरवर गजानन आढाव असे नाव आले. फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गोपाळ आढाव याने त्यांच्या मोबाईलवर “लय नाटक करुन नका, तुझे घरच्यांना नीट ताकीद दे, नाही तर तुझे घरी येऊन हातपाय तोडीन,” असा मेसेज करुन पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. वाघोली पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *