• December 29, 2024
  • No Comment

1 जानेवारीपासून UPI च्या महत्त्वाच्या नियमात बदल! नियमाला RBIची मंजुरी, पहा सविस्तर

1 जानेवारीपासून UPI च्या महत्त्वाच्या नियमात बदल! नियमाला RBIची मंजुरी, पहा सविस्तर

    युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियमाला मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने UPI ट्रांझेक्शन आणि वॉलेट पेमेंटच्या लिमिट बदलल्या आहेत.

    ही लिमिट वाढवण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, लोक आता UPI 123Pay वापरून 5 रुपयांऐवजी 10 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतील. अशा परिस्थितीत आता प्रीपेड वॉलेट फोनपे, यूपीआय आणि पेटीएम वापरणे सोपे झाले आहे, परंतु या नवीन नियमाचा फायदा घेण्यासाठी वॉलेटचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वॉलेट ॲपशी लिंक असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही वॉलेटमधून UPI ​​पेमेंट कराल, तेव्हा आधी पेमेंट मंजूर केले जाईल, त्यानंतर तुम्हाला UPI ॲपमध्ये प्रवेश मिळेल, परंतु तुम्ही त्यात कोणतीही बँक किंवा वॉलेट जोडू शकणार नाही.

    नवीन पेमेंट ऑप्शन OTP बेस्ड सर्व्हिसः

    दुसरीकडे, आता UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी OTP आवश्यक असेल. हा नियम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जात आहे. लोकांच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. UPI 123Pay मध्ये पेमेंट करण्यासाठी यूझर्सला 4 ऑप्शन मिळतात. एक म्हणजे IVR नंबर्स, दुसरा मिस्ड कॉल्स, तिसरा OEM-एम्बेडेड ॲप्स आणि चौथा म्हणजे साउंड बेस्ड टेक्नॉलॉजी, पण आता यात आणखी एक पर्याय OTP आधारित सेवा देखील जोडण्यात आली आहे. नवीन नियमांचा मोठा फायदा म्हणजे आता लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अधिक पैसे सहज पाठवू शकतील. वेळेची बचत होईल आणि पेमेंटही सुरक्षित होईल. यामुळे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) ची कार्य क्षमता देखील वाढेल. UPI 123Pay सेवा इंटरनेटशिवाय काम करते त्यामुळे यूझर्ससाठी ती अधिक फायदेशीर आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *