• December 29, 2024
  • No Comment

पुणेकरांच्या खिशाला कात्री ! CNG च्या दरामध्ये पुन्हा वाढ, नक्की कारण काय?

पुणेकरांच्या खिशाला कात्री ! CNG च्या दरामध्ये पुन्हा वाढ, नक्की कारण काय?

पुणे: पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, कारण, CNGच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो इतकी दरवाढ करण्यात आली आहे.

सी एन जी साठी आता नवीन किंमत 89 रुपये प्रति किलो इतकी राहणार आहे. याआधी सीएनजीचा दर 87.90 प्रति किलो इतकी होता. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर 89 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. नवीन आज पासून हे दर लागू झाले असून पुणे आणि परिसरात दर 89 रुपये प्रतिकिलो रुपये प्रतिकिलो झाला आहे. या दरवाढीमुळे ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे.

या आधी विधानसभा निकालापूर्वी राज्यात ‘सीएनजी’च्या दरात वाढ झाली होती. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून वाहनचालक ‘सीएनजी’कडे वळले आहेत. त्यात आता ‘सीएनजी’च्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे, त्यामुळे त्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.

शहरात साधारण सर्व रिक्षा ‘सीएनजी’वर चालतात. यामुळे ही दरवाढ खिशाला चटका देणारी आहे. याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. कारण सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ‘सीएनजी’वर अवलंबून आहे. दरात वाढ झाल्यामुळे व्यवसाय करणे अशक्य झाल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

दर नक्की कशामुळे वाढले?

तर आयात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारित पुरवठा याचं संतुलन करण्याचं मोठं आव्हान MNGLसमोर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य व्हॅटचा समावेश असेल, जे एकूण वाढी पैकी सुमारे 15% आहे

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *