• December 29, 2024
  • No Comment

शेडचे काम करताना कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

शेडचे काम करताना कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

    पुणे: बांधकामच्या ठिकाणी शेडचे काम करताना एका कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नऱ्हे भागातील वरद एंटरप्रायझेस येथे गुरुवारी दुपारी घडली आहे. या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.

    याप्रकरणी ठेकेदार सुरेश अरविंद पांचाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विलास बाबुराव पांचाळ (वय 62, रा. आनंदप्रभात अपार्टमेंट, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर जखमी झालेल्याचे नाव पांडुरंग बाबुराव काळे असे आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठेकेदार सुरेश पांचाळ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. विलास पांचाळ, पांडुरंग काळे हे त्यांच्याकडे कामाला आहेत. न-हे भागातील वरद एंटरप्रायझेस येथे पत्र्याची शेड उभे करण्याचे काम ठेकेदार सुरेश पांचाळ यांना देण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ते शेडचे काम करत होते त्यावेळी तोल जाऊन त्यांचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरुन ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *