• December 29, 2024
  • No Comment

दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा सविस्तर

दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा सविस्तर

    पुणे: जानेवारी २०२५ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

    पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी २ आणि ३ जानेवारी २०२५ रोजी खेड, ६ आणि ७ जानेवारी रोजी मंचर, १३ आणि १४ जानेवारी रोजी जुन्नर, २० आणि २१ जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि २७ आणि २८ जानेवारी २०२५ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

    कसा करा अर्ज:

    शिकाऊ अनुज्ञप्ती काढून ३० दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
    आवश्यक कागदपत्रे –
    – नमुना ४ (Form ४)
    – शिकाऊ अनुज्ञप्ती
    – नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
    – वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम ४ नुसार पुरावा.
    – परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
    – शुल्क्
    – ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.

    चाचणी परिक्षा:
    वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *