• December 29, 2024
  • No Comment

रेल्वेत टीसी असल्याचा बनाव करत; माजी सैनिकाला लावला १७ लाखांना गंडा

रेल्वेत टीसी असल्याचा बनाव करत; माजी सैनिकाला लावला १७ लाखांना गंडा

    पुणे: आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असून तुमच्या कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरी लाऊन देतो, असं खोटं आश्वासन देत महिलेने माजी सैनिकाला अधिकाऱ्याला १७ लाखांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे.

    पुणे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगिता पाटणे, असं या महिलेचं नाव असून तिचा शोथ सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    सुरेश नाईक फसवणूक झालेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचं नाव आहे. सुरेश नाईक हे २०२१ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रीशन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना इलेक्ट्रीकचं काम करण्यासाठी एका महिलेचा कॉल आला, तिने तिचं नाव संगिता पाटणे असं सांगितलं.

    महिलेच्या कॉलनंतर सुरेश नाईक काम करण्यासाठी महिलेच्या वनवाडी येथील घरी गेले. त्यावेळी महिलेने त्यांना आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असल्याचं सांगितलं. सुरेश नाईक यांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेने त्यांना तिचे आयकार्डही दाखवले. याशिवाय तुमच्या मुलींना रेल्वे नोकरी लावून देतो, असं आश्वासनही दिलं.

    दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये महिलेने सुरेश नाईक यांना फोन करत ११.५ लाख रुपयांची मागणी केली. पतीला ब्रेन ट्यूमरचा त्रास असून त्याचे ऑपरेशन करायचं आहे, इंशूरन्सचे पैसे आल्यावर तुमचे पैसे परत देईन, असं तिने सांगितलं. त्यामुळे सुरेश नाईक यांनी महिलेला पैसे दिले.

    पुढे मे २०२३ मध्ये महिलेने पुन्हा सुरेश नाईक यांना फोन करत कुटुंबातील दोघांना नोकरी लावून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. सुरेश नाईक यांनी पुन्हा महिलेला ५.५ लाख रुपये दिले. मात्र, बरेच महिने नोकरी न मिळाल्याने सुरेश नाईक यांनी महिलेला पैसे परत मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. तसेच महिलेच्या मुलाने सुरेश नाईक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, सुरेश नाईक यांच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *