• December 30, 2024
  • No Comment

देशी दारूचा कारखाना उध्वस्त; पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी

देशी दारूचा कारखाना उध्वस्त; पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी

    पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरापासून जवळ असलेल्या आळंदी पोलीस स्टेशन परिसरात रसायन वापरून देशी दारू तयार करण्यात येत होती. आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता.

    पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत जेसीबी मशीनच्या सहाय्याने कारखाना उध्वस्त केला आहे. दरम्यान या ठिकाणी कोणीही सापडून आले नाही.

    पिंपरी चिंचवड शहरापासून जवळ असलेल्या आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील कोयाळी रोड येथील कंजारभाट वस्ती परिसरात देशी दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता. उघड्यावर हा कारखाना सुरु असून याठिकाणी रसायन टाकून दारू तयार करत विकली जात होती. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे येथे छापा टाकून गुन्हे शाखा क्रमांक तीन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील कोयाळी रोड येथील कंजारभाट वस्ती या ठिकाणी मोरवती राजपूत ही महिला रसायनापासून देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत आहे. अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक तीनला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मोरवती राजपूत हिच्या विरोधात आनंदी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

    पिंपरी चिंचवड पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. याठिकाणी देशी दारू बनविण्यासाठी असलेल्या जवळपास दीड लाख रुपये किमतीचा लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेला तीन हजार लिटर रसायन पोलिसांनी जेसीबी मशीन लावून उध्वस्त केले आहे. दरम्यान या कारवाईत कोणीही ताब्यात घेण्यात आले नसून कारखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *