• December 30, 2024
  • No Comment

हुक्का पार्लर वर पोलिसांचा छापा, गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी

हुक्का पार्लर वर पोलिसांचा छापा, गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी

    पुणे: गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली आहे.

    भरत देवाप्पा गावडे (वय ३३, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर), दिपेंद्र मानबहादुुर खडका (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर) आणि सिद्धार्थसिंग अशोक कुमार सिंह (वय २२, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मार्केटयार्डमधील गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलयन्स लाऊन्ज येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.

    याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिलियन्स लाऊन्ज येथे हुक्का पिण्यास दिले जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची खात्री केल्यानंतर सायंकाळी हॉटेलवर छापा घालण्यात आला. त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का पॉट, तंबाखुजन्य अफजल, अलफकर, अलकियान हे हुक्का फ्लेवर ग्राहकांना धुम्रपानासठी अवैधरित्या विना परवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मिळून आले.

    सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *