• December 30, 2024
  • No Comment

मित्राची एक चुक आणि त्याला गमवावा लागला आपला जीव, आरोपी मित्रावर गुन्हा दाखल

मित्राची एक चुक आणि त्याला गमवावा लागला आपला जीव, आरोपी मित्रावर गुन्हा दाखल

    पुणे: दारु पिऊन मित्रासह मोटारसायकलवरुन घरी जात असताना कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला शाळेच्या मैदानात टाकून देऊन तो पळून गेला.

    वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या मित्राचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोटारसायकलचालक संतोष नागनाथ भिसे (वय २५, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा लक्ष्मण ससाणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयासमोर २५ डिसेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजता घडला होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भिसे आणि कृष्णा ससाणे हे दोघे मित्र असून एकमेकांचे नातेवाईकही होते. २५ डिसेंबर रोजी ते दारु पित बसले होते. त्यानंतर पहाटे ते घरी जात होते. संतोष भिसे हा मोटारसायकल चालवत होता, तर कृष्णा ससाणे हा मागे बसला होता. पुष्प मंगल कार्यालयासमोर संतोष भिसे याने राँग साईडने जात असताना समोरुन येणार्‍या वॅगनर गाडीला धडक दिली. त्यामुळे मागे बसलेला कृष्णा ससाणे याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुला तसेच दोन्ही हाताचे कोपर्‍यावर, गुडघ्यावर, उजव्या पायाच्या पंज्यावर गंभीर जखमा झाल्या. त्याला उपचाराची गरज होती.

    असे असताना कोणालाही न कळविता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या पटांगणात कृष्णा ससाणे याला ठेवून तो परस्पर निघून गेला. कृष्णा ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला.

    याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी सांगितले की, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हाला मैदानात मृतदेह मिळाला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे दिसून आले. त्याचा तपास केल्यानंतर मैदानात जो मृतदेह सापडला, ती व्यक्ती या अपघातात असल्याचे दिसून आले. कृष्णा ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे मोटारसायकलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *