• December 30, 2024
  • No Comment

शहरातील 14 पीआय एसीपीच्या प्रमोशन निवड सूचीत समावेश

शहरातील 14 पीआय एसीपीच्या प्रमोशन निवड सूचीत समावेश

    पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एकूण 14 वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचा सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक पदावरील पदोन्नतीसाठीच्या निवडसूचीत समावेश करण्यात आला आहे.

    पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने जाहीर केलेल्या निवडसूचीतील 466 पैकी शहरातील 14 वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

    राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने सन 2024-25 या सालामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक पदावरील पदोन्नतीच्या कार्यकक्षेत विचाराधिन असलेल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची माहिती मागविण्यात आलेली आहे.

    राज्यभरातील पोलीस दलातील एकूण 466 वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची निवडसूची तयार करण्यात आली असून, प्रत्येक पोलीस घटकाला संबंधित वरिष्ठ पोलीस निरिक्षकाची विहित नमुन्यातील माहिती वेळेवर सादर करण्याची सूचना करण्यात आले आहे.

    या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचा निवडसूचीत समावेश आहे:

    निवृत्ती बाबुराव कोल्हटकर, शंकर रामभाऊ डामसे, जितेमद्र वसंतराव कोळी, सतीश विठ्ठलराव नांदुरकर, शैलेश सुधाकर गायकवाड, ज्योती घन:शाम बागुल, प्रसाद शंकर गोकुळे, विश्वजीत वसंत खुले, अंकुश पांडुरंग बांगर, विजय जानकीराम वाघमारे, कन्हैयालाल पन्नालाल थोरात, वसंतराव दादासाहेब बाबर व श्रीराम बळीराम पोळ.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *