• December 31, 2024
  • No Comment

चक्क स्वतःच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

चक्क स्वतःच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

    पिंपरी: मिळकतीच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी दिली. मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

    त्यामुळे ५३ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी येथे शनिवारी (दि.२८) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला पोलिस कर्मचारी हा फिर्यादी महिलेचा भाऊ आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिस कर्मचारी पत्नी आणि मुलीसह फिर्यादी बहिणीच्या घरी आला.

    बहिणीसोबत आईदेखील होती. त्यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली. ‘मीपण पोलिस आहे, मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल’, असे तो म्हणाला. त्यानंतर पत्नी आणि मुलीला तो म्हणाला की, तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही तर मी फास लावून आत्महत्या करेन. फिर्यादी बहिणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *