• January 1, 2025
  • No Comment

मोटारीची काच फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज केला लंपास*; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मोटारीची काच फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज केला लंपास*; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: पार्क केलेल्या कारची काच फोडून सोन्याचे दागिने, रोकड असा दोन लाख ८७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली.

    याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कार चालक शनिवारी सायंकाळी खराडी भागातून निघाले होते. मिठाई खरेदीसाठी त्यांनी कार एका मिठाई विक्री दुकानाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास लावली.

    कारमधील पिशवीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज होता. चोरट्यांनी कारची काच फोडून ऐवज असलेली पिशवी चाेरून नेली. मिठाई खरेदी करुन पंधरा मिनिटांनी ते मोटारीजवळ आले. तेव्हा मोटारीची काच फोडून ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत. सिंहगड रस्ता भागात गेल्या आठवड्यात एका मोटारीची काच फोडून चोरट्यांनी २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शहर, तसेच उपनगरात मोटारीची काच फोडून ऐवज चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *