• January 1, 2025
  • No Comment

वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी, पहा सविस्तर

वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी, पहा सविस्तर

    पुणे: पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला व मागील 21 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड याला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिवसांची 15 दिवसांची (ता.14 जानेवारी पर्यंत) सीआयडी कोठडी सुनावली.

    यावर मंगळवारी (ता. 31) रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली. दरम्यान, सरकारी वकिलांनी ऐनवेळी वैयक्तिक कारण देत या प्रकरणातून माघार घेतली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या दोन प्रकरणासह पावनचक्कीवरील वॉचमनला मारहाण प्रकरणी अट्रोसिटी व पावनचक्कीवर भांडण असे इतर दोन गुन्हे देखील दाखल आहेत. या चारही प्रकरणांचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

    दरम्यान, खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्का लीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आरोपी आहेत. विष्णू चाटे सध्या याच प्रकरणात कोठडीत आहे. दरम्यान, ता. 11 डिसेंम्बर 2024 रोजी दाखल गुन्ह्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. त्याच्या अटकेसाठी मोठा मोर्चा देखील निघाला. पोलीस यंत्रणेच्या अपयशाचीही चर्चा झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळी तो पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात तो शरण आला. त्यानंतर त्याच्यावरपोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला केजला न्यायालयासोर हजर करण्यासाठी आणले.

    अगोदर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले. वाल्मिक कराडला केजला आणणार असल्याने त्याच्या समर्थकांनी या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता. न्यायाधीश एस. वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सीआयडीचे वकील ऍड. जे. बी. शिंदे यांनी 15 दिवसांची कोठडी मागितली. न्यायाधीश श्री. पावसकर यांनी 15 दिवसांची कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याच्याकडून ऍड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली.

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *