• January 1, 2025
  • No Comment

औंधमधील खुनाचा १२ तासांत उलगडा; पोलिसांकडून दोन आरोपी गजाआड

औंधमधील खुनाचा १२ तासांत उलगडा; पोलिसांकडून दोन आरोपी गजाआड

    औंध: येथील एका युवकाचा काल सायंकाळी सुतारखडवी परिसरात मृतदेह आढळून आला. याप्रकरणी औंध पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांमध्ये दोघांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला. रामदास अशोक दंडवते (वय २८, रा.औंध) असे मृताचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी, की शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रोहन मल्हारी मदने, गुरुराज दत्तात्रय मदने व रामदास दंडवते हे सुतार खडवी परिसरात मद्यपान करत बसले होते. दरम्यान, तिघांमध्ये वादावादी सुरू झाली, त्यानंतर त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये संशयित रोहन मदने याने रामदास दंडवते याच्या डोक्यात दगड घातल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोणास सापडू नये म्हणून दोन्ही संशयितांनी सुतार खडवीजवळच्या झाडीत लपवून ठेवला. सुमारे १० दिवस हा मृतदेह त्या झाडीत तसाच होता.

    याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज, औंध, खरशिंगे परिसरात कसून शोध घेतल्यानंतर रामदास दंडवते याचा मृतदेह गोपूजनजीक सापडला.

    या घटनेची फिर्याद लीला अशोक दंडवते यांनी दिली आहे. घटनास्थळी कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित रोहन मदने यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये त्याचे चुलते गुरुराज दत्तात्रय मदने सहभागी असल्याचे सांगितले.

    त्यानंतर लोणंद येथून मंगळवारी पहाटे चार वाजता गुरुराज मदने यास अटक केली.

    सदररची कारवाईत अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर, अनिल शिरोळे, अविनाश वाघमारे, पोलिस हवालदार राहुल वाघ, दादासाहेब देवकुळे, पोलिस कॉन्स्टेबल साहिल झारी, प्रमोद इंगळे यांनी सहभाग घेतला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *