• January 1, 2025
  • No Comment

सतीश वाघ खून प्रकरण: मोहिनी वाघ, अतिश जाधवची येरवडा कारागृहात रवानगी

सतीश वाघ खून प्रकरण: मोहिनी वाघ, अतिश जाधवची येरवडा कारागृहात रवानगी

    हडपसर: हडपसरमधील शेतकरी तसेच हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्यासह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    वानवडी येथील न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रचेता राठोड यांनी हा आदेश दिला.

    पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विक्की शिंदे, अक्षय जावळक, मोहिन वाघ व अतिश जाधव अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना सोमवारी (दि. 30) न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला.

    युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. वाघमारे म्हणाल्या, जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकले असल्याचे सांगितले आहे. त्यासमक्ष गोताखोर टीमच्या साहाय्याने नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला. मात्र, हत्यार अद्याप सापडले नाही. तपास करायचा असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. वाघमारे यांनी केला. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *