• January 1, 2025
  • No Comment

पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; १०० पदांसाठी लवकरच सुरु होणार अर्जप्रक्रिया

पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; १०० पदांसाठी लवकरच सुरु होणार अर्जप्रक्रिया

    पुणे: मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महापालिकेतील रखडलेली १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे.

    महापालिकेने मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी १०० कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत.

    मात्र, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातूनही अर्ज दाखल करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे महापालिकेने अभियंता भरतीची प्रक्रिया थांबविली होती. राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरभरतीत सामावून घेण्याचा अध्यादेश महापालिकेने अभियंता भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया आयपीबीएस या संस्थेच्या माध्यमातून राबविली जाण्याची शक्यता आहे.

    याबाबत बोलताना महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. म्हणाले कि, राज्य शासनाच्या आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून नोकरीमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, आर्थिक मागास वर्गासाठी देखील आरक्षणाचा आदेश आहे. या पार्श्वभूमीवर अभियंता भरतीची नव्याने जाहिरात काढण्याबाबत आम्ही तयारी करत आहोत. यापूर्वी आलेल्या अर्जाबाबत तसेच फीबाबतही काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ जानेवारीपर्यंत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *