• January 1, 2025
  • No Comment

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षाच्या महिलेसह तरुणीला केली बेदम मारहाण, आई भावाला मारहाणीपासून सोडविणे शेजारच्याला पडले महागात

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षाच्या महिलेसह तरुणीला केली बेदम मारहाण, आई भावाला मारहाणीपासून सोडविणे शेजारच्याला पडले महागात

    पिंपरी: अल्पवयीन मुलगा त्याच्या आई व भावाला मारहाण करीत होता. हे पाहून शेजारी राहणारा तरुण भांडणे सोडविण्यास मध्ये गेला. याचा राग येऊन या मुलाने त्याच्या आईला दगडाने मारले.

    तिला वाचविण्यासाठी आलेल्या घरमालकाच्या बहिणीला दगडाने खांद्याला व दोन्ही हाताला मारुन जखमी केले. वाकड पोलिसांनी या १६ वर्षाच्या मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत मिराबाई राजेंद्र बोरसे (वय ५५,रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार थेरगावातील गणेशनगरमधील शिवकॉलनीत २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संजय बोरसे याच्या घराजवळ फिर्यादीचे शेजारी राहणार्‍यांचा अल्पवयीन मुलगा आपल्या आई व भावाला मारहाण करीत होता. हे पाहून संजय बोरसे हा भांडणे सोडविण्यासाठी गेला. त्याचा राग येऊन या अल्पवयीन मुलाने धक्काबुक्की करुन जोरजोरात ओरडुन शिवीगाळ करत फिर्यादीच्या घराच्या दारावर लाथा मारुन तुम्हा ऐकेकाला सोडणार नाही.

    तुम्हाला खल्लास करुन टाकील, असे हातात दगड घेऊन धमकावुन दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या मदतीला आलेल्या घरमालकाची बहिण यांना या मुलाने हातातील दगडाने खांद्याला व दोन्ही हाताला मारुन जखमी केले. फिर्यादी जवळ आला व त्याने रागारागात आता तुला सोडणार नाही़ तुला खल्लास करुन टाकतो. तुझ्या मुलाला पण सोडणार नाही, असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या हातातील दगडाने फिर्यादीचे उजव्या डोळ्याच्या खाली जोरात मारुन जखमी केले. फिर्यादीच्या डोळ्याखाली मार लागल्याने त्यांना चक्कर आली व अंधारी येऊन त्या खाली पडल्या. त्यांचा वाचविण्यासाठी त्यांची सून आली असता तिला धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली. हातामध्ये दगड घेऊन मध्ये जर कोण आला तर एकेकाला जिवंत सोडणार नाही, असे धमकावून दुसर्‍या मुलाच्या मोटारसायकलीवर बसून पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *