• January 1, 2025
  • No Comment

पुणे स्टेशन आवारात प्रवासी तरुणाला लुटले; रिक्षाचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे स्टेशन आवारात प्रवासी तरुणाला लुटले; रिक्षाचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: प्रवासी तरुणाला धमकावून रिक्षाचालक आणि साथीदारांनी सहा हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाचालकाने तरुणाला सोडण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लुटल्याचे उघडकीस आले आहे .याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत एका २० वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा चाकणचा आहे. तो कामानिमित्त सोमवारी (३० डिसेंबर) सकाळी सहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात आला. तेथून तो रिक्षाने जाणार होता. तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ रिक्षाचालकाला त्याने इच्छितस्थळी सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि त्याच्याबरोबर साथीदार होता. तरुणाला रिक्षातून घेऊन त्याला निर्जन ठिकाणी नेले. त्याला शिवीगाळ, तसेच मारहाण करुन खिशातील १२०० रुपयांची रोकड काढून घेतली.

    त्यानंतर रिक्षाचालकाने त्याच्याकडे आणखी पैसे मागितले. तरुणाला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने रिक्षाचालकाकडे चार हजार ९०० रुपये जमा केले. तरुणाला सोडून रिक्षाचालक साथीदारासह पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत. शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पादचाऱ्यांकडील मोबाइल संच, दागिने चोरून नेणे, धमकावून रोकड लुटणे अशा प्रकारचे १६७ हून जास्त गु्न्हे दाखल झाले आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *