• January 1, 2025
  • No Comment

शेतकर्‍याकडे खंडणी मागणाऱ्यारा सराईत जेरबंद, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी

शेतकर्‍याकडे खंडणी मागणाऱ्यारा सराईत जेरबंद, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी

    मोशी: मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून त्यांच्या गाड्याच्या काचा फोडणार्‍या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी कात्रजमधून अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

    अनिकेत भरत उतळे (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, आदर्शनगर, मोशी) याला व दोन अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोरील अश्विनी लॉज येथून ताब्यात घेतले होते.

    याबाबत शेषराव सोनेराव फड (वय ५०, रा. विनायकनगर, बोर्‍हाडेवाडी, मोशी, मुळ रा. दौंडवाडी, घाटनांदूर, ता. परळी, जि. बीड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोशीतील आदर्शनगर येथील आठवडे बाजारात सोमवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडला होता.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील आदर्शनगर येथे भाजीपाला विक्रेते आठवडे बाजारासाठी आले होते. हा भाजीपाला विक्री करत असताना रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान तिघे जण तेथे आले. त्यांनी भाजीपाला विक्रेत्यांकडे आदर्शनगरमध्ये बाजारामध्ये दुकान लावायचे असेल तर प्रत्येकाने प्रत्येक बाजाराचे २०० रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. बाजारातील विक्रेत्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी भाजी विक्रेते व इतरांच्या ३ ते ४ गाड्यांवर दगड मारुन काचा फोडल्या. तेथे उभ्या असलेल्या एका दुचाकीवर कोयता मारला़ हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. याची तक्रार मिळाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकास आदेश दिला. या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेऊन समांतर तपास सुरु केला. प्रथम गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरुन तिघांना कात्रजमधील अश्विनी लॉज येथून ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

    सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, एमाआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार तसेच खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याकडील नितीन खेसे, चंद्रकांत गवारी या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *