• January 1, 2025
  • No Comment

खंडणी न दिल्याने गुंडाने लाकडी दांडक्याने केली तोडफोड, आरोपी टोळका गजाआड

खंडणी न दिल्याने गुंडाने लाकडी दांडक्याने केली तोडफोड, आरोपी टोळका गजाआड

    भोसरी: मोबईल शॉपीचालक महिलेने २ हजार रुपयांची खंडणी न दिल्याने मी इथला भाई आहे, म्हणत एका गुंडाने दुकानाचे काऊंटर व बाहेर असलेल्या दुचाकीवर लाकडी दांडक्याने मारुन तोडफोड केली.

    एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.

    अशोक दुर्गा पवार (वय १९, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत एका महिला दुकानदाराने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार टेल्को रोडवरील बालाजीनगर येथी सीमरन मोबाईल शॉपी या झेरॉक्स शॉपमध्ये मंगळवारी सकाळी ११ व सायंकाळी पावणेपाच वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सीमरन मोबाईल शॉपी नावाने झेरॉक्सचे दुकान आहे. गुंड अशोक पवार हा सकाळी दुकानावर आला व त्याने २ हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा तो निघून गेला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. मी इथला भाई आहे, तुला माहित नाही काय? तुला जगायचा कंटाळा आला काय?, असे मोठमोठ्याने ओरडून हातातील लाकडी दांडक्याने त्यांचे दुकानाचे काऊंटरवर व बाहेर उभा असलेल्या दुचाकीवर मारुन तिचे नुकसान करु लागला. तेव्हा परिसरातील लोक त्याला अडविण्यासाठी आल्यावर गुंड पवार त्यांना लाकडी दांडक्याने मारण्यास धावून गेला. तेव्हा ते घरात
    पळाले. त्याने परिसरात दहशत निर्माण करण्याकरीता त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने रस्त्याचे कडेला पार्क केलेल्या मोटारसायकलवर मारुन त्यांचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *