• January 1, 2025
  • No Comment

माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या भावाला अटक; विनयभंग प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या भावाला अटक; विनयभंग प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    पिंपरी: विवाहितेशी गैरवर्तन करून तसेच फोनवरून अश्लील बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या भावाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    पिंपरी येथे २६ ऑक्टोबर आणि २७ डिसेंबर २०२४ रोजी ही घटना घडली.

    चेतन बाबासाहेब ननावरे (रा. फुलेनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित विवाहितेने शनिवारी (दि. २८) संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता कायदा कलम २०२३ च्या कलम ७४, ७५, ७९ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला. यातील संशयित चेतन ननावरे हा माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा भाऊ आहे.

    संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, चेतन ननावरे याने पीडित विवाहित महिलेसोबत गैरवर्तन केले. ”मी तुला सांभाळतो, मी तुला सांगतो तू एवढे का वाढीव करीत आहे, असे तो पीडितेला म्हणाला. ”दरवाजा उघडा ठेव मी येतो”, असे फोन करून म्हणाला. फिर्यादी पीडित विवाहितेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    पेालिस उपनिरीक्षक गणेश आटवे पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *